Home नांदेड उंद्री ( प .दे.) ता. मुखेड येथील वारकरी संप्रदायाचे महामेरू स्व. सूर्यभान...

उंद्री ( प .दे.) ता. मुखेड येथील वारकरी संप्रदायाचे महामेरू स्व. सूर्यभान शामराव पाटील वडजे यांचे अल्पशा आजाराने निधन..

208

राजेंद्र पाटील राऊत

उंद्री ( प .दे.) ता. मुखेड येथील वारकरी संप्रदायाचे महामेरू स्व. सूर्यभान शामराव पाटील वडजे यांचे अल्पशा आजाराने निधन..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री (प .दे.) ता. मुखेड येथील सेवा सहकारी सोसायटीचे मा. चेअरमन , वारकरी संप्रदायाचे हरिभक्त पारायण वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर पायी दिंडी सोहळ्याचे प्रमुख विणेकरी व गेली चाळीस वर्ष वारकरी संप्रदायाची पताका श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठलाच्या चरणी घेऊन जाणारे हरिभक्त पारायण सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, प्रसिद्ध गायक, प्रसिद्ध वादक, प्रखर हिंदुत्ववादी विचारधारेचे निष्ठावान कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे शाखा अध्यक्ष,हरी भक्त पारायण वैकुंठवासी सूर्यभान शामराव पाटील वडजे उंद्रीकर यांचे बुधवारी दिनांक 13 मे 2021 रोजी पहाटे 4 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 67 वर्ष होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने गावावर व पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुले, नात, नातू असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दिनांक 13 मे 2021 रोजी दुपारी 4 वाजता उंद्री ( प.दे.) ता. मुखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .शोकाकुल वडजे परिवार व समस्त गावकरी मंडळी उंद्री(प.दे.) ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम शांती ओम भावपूर्ण श्रद्धांजली.

Previous articleअशोक चव्हाण करणार देशभरातील विधानसभा निवडणूक निकालांची समीक्षा.
Next articleचांदवड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी तब्बल सव्वा सहा लाख रुपये वर्गणी जमा केली.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.