Home नांदेड पराग सामाजिक संस्थेच्या वतीने; दिव्यांग व कोरोनाने मृत्यू पावलेल्या कुटूंबियांना रेशन किटचे...

पराग सामाजिक संस्थेच्या वतीने; दिव्यांग व कोरोनाने मृत्यू पावलेल्या कुटूंबियांना रेशन किटचे वाटप…..

190

राजेंद्र पाटील राऊत

पराग सामाजिक संस्थेच्या वतीने; दिव्यांग व कोरोनाने मृत्यू पावलेल्या कुटूंबियांना रेशन किटचे वाटप…..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

दि .9 मे 2021 नांदेड जिल्ह्यात वेळोवेळी पराग सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून गेल्या 2 वर्षा जगात कोरोना महामारी बिमारीनेने थैमान घातल्याने परिणामी भारत देशात सरकारने कडक लाँकडाऊन लावण्यात आले अश्या बिकट परिस्थितीमध्ये गोर-गरिब रुग्णांंणा मदतीचा हात देण्यासाठी काम करत संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत गवळे ह्याच्या मार्गदर्शनाखाली कोविड निर्मूलन जनजागृती कार्यक्रम,
अन्नधान्ये,तेल पॉकेट तसेच,सॅनिटायझेर,मास्क,संतूर साबण / हँडवॉश,इत्यादी सामानाचे जिल्ह्यातील नागरिकांना मोफत वाटप केले आहेत.त्यांचे हे समाजकार्य चालुच आहे.त्याचाच एक भाग म्हणुन आज दिनांक 9/5/2021 रोजी नांदेड शहरातील पिरपूरहान नगर येथील दिव्यांग कुटुंबांंना व ज्या कुटुंबातील व्यक्तीचे कोरोनामुळे मृत पावले आहेत अश्या 70 कुटुंबांना गहू,तांदूळ,तेल, साबण,मास्क,सॅनिटायझेर,हँडवॉश इ . साहित्य एका कुटुंबाला एक महिना पुरेल इतक्या धान्य किटचे वाटप केले.यावेळी वाटप करतांना प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत गवळे,सचिव जयश्री गवळे,प्राचार्य कान्हा शिरसाट,अँँड. नवनाथ भद्रे ,करूणाताई शंडेराव,रणजीत गवळे ,डॉ.पराग गवळे, पायल गवळे यांच्या सह संस्था पदाधिकारी व कर्मचारी इ .प्रमुख उपस्थिती मध्ये वाटप करण्यात आले ह्यावेळी मोठया प्रमाणात दिव्यांग बांधव व कोरोनाने मृत पावलेल्या कुटुंबियांच्या नातेवाईकांची उपस्थिती होती.या संस्थेच्या माध्यमातून केलेल्या समाजीक उपक्रमाचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.