राजेंद्र पाटील राऊत
नायगाव तालुक्यातील शेळगांव (गौरी)कोरोना ‘कोव्हॅक्सिन’ लसीकरनाचे अनुकरण जिल्हातील सर्व गावानी करावे-
खा.प्रतापराव पा.चिखलीकर
नायगाव तालुका प्रतिनिधी माधवराव घाटोळे ( युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड जिल्हयातील नायगांव तालुका चे आदर्श गांव शेळगांव (गौरी) गावातील जनतेने 100%कोरोना लसीकरण घेऊन जिल्हात अव्वल क्रंमाक मिळविला या गावाचे लस अनुकरण नांदेड जिल्हातील सर्व ग्रामीण ग्रामपंचायत ने करावे आसे प्रतिपादन नांदेड जिल्हाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी व्यक्त केले.
शेळगांव गौरी येथील व खासदार चिखलीकर याचे कट्टर समर्थक सुनिल रामदासी याच्या वाढदिवसा निमित्ताने फोनवरून शुभेच्छा देऊन शेळगांव गौरी गावाने कोरोना लस शिबीरात नांदेड जिल्हात प्रथम क्रंमाक मिळवल्याबद्दल गावातील जनतेचे कौतुक करुन अभिनंदन यावेळी खा.चिखलीकर यानी केले.
शेळगांव (गौरी) या गावाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना.पाणी व्यवस्थापण.शैक्षणिक कार्यातसुद्धा आपले नांव संपूर्ण महाराष्ट्रात कमावलेले आहे.गावातील आनेक तरुण शिक्षणाच्या माध्यमातून आय.एस.वैद्यकिय झेत्रात एम.बी.बी.एस.प्राचार्य.प्राध्यापक.शिक्षक सामाजिक.राजकीय झेत्रातसुद्धा गावातील तरुण मंडळी मेहनत घेतल्याबद्दलही गावाचे अभिनंदन करण्याचा योग या निमित्ताने आला आसेही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी भावना व्यक्त केली.
कोरोना लस शिबीरात शेळगांव गौरी चा आदर्श नांदेड जिल्हातील सर्व ग्रामपंचायत गावानी घ्यावा व या कोरोन लस मध्ये शेळगांव गावाने प्रथम क्रमांकाचे मान मिळविला त्या ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच.ग्रामपंचायत सदस्य.सोसायटी चे चेअरमन.सदस्य.ग्रामविकास अधिकारी.तलाठी.वैद्यकीय अधिकारी.गावातील शिक्षक.सर्व आजी माजी पदाअधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी व सर्व गावकर्याचे अभिनंदन खा.चिखलीकर यानी केले