राजेंद्र पाटील राऊत
सुरगाणा,(पांडूरंग गाययकवाड तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
आज दि. 26 एप्रिल 2021 रोजी माजी सभापती पं. स. सुरगाणा श्रीमती मंदाकिनी भोये यांनी सकाळी 8 वाजता आंबोडे येथे प्रत्येक्ष भेट देऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन तेथील ग्रामस्थांना एकत्रित केले त्यांना कोरोना लसीकरनाचे महत्व पटवून दिले व कोरोना पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लसीकरण करून घेणे किती गरजेचे आहे ते पटवून दिले तेव्हा तेथील ग्रामस्थांनी लसीकरणा संदर्भात अशी माहिती दिली की सकाळी आम्हाला गुजरात मधील जामले या गावावरून असा फोन आला की तुम्ही लस घेऊ नका कारण जामले (गुजरात) मधील जेव्हड्या लोकांनी कोरोनाची लस घेतली त्यातला एक ही माणूस जगला नाही सगळे मेले तेव्हा आम्ही लस घ्यायला घाबरतो त्यावेळी स्वतःचे व आंबूपाडा लसीकरण केंद्रामध्ये जेव्हड्या लोकांनी लस घेतली त्या पैकी कोणाच्या जीवाला काय झाले ते सांगा असा प्रतिप्रश्न करून तसेच इतर उदाहरण देऊन त्यांची खात्री पटवून दिली की आपल्या भागात जे लोक मृत्यू पावले आहेत ते कोरोना लस न घेतल्यामुळे किंवा वेळीच तपासणी न केल्यामुळे झाले आहेत याउलट ज्यांनी लस घेतली ते सुरक्षित आहे. अश्या प्रकारे त्यांच्या अनेक शंका कुशंकाचे निरसन झाल्यानंतर ते लस घेण्यास तयार झाले त्यानंतर सर्व 45 वर्ष वयाच्या पुढील ग्रामस्थांना स्वतः बरोबर घेऊन आंबूपाडा PHC मध्ये आणले.
शेवटी सर्वांनी गैरसमजांना तिलांजली देत कोरोना लस टोचून घेतली
त्या निमित्त त्यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले व आपले हे योगदान आपल्या कुटुंबासाठी व गावातील इतरांसाठी निश्चितच फायद्याचे ठरेल व आपल्याला पाहून इतरही लोक लस घेण्यास प्रेरित होतील असे सांगून सर्वांचे लस घेतल्याबद्दल आभार मानले.
👏👏👏🌹🌹🌹