राजेंद्र पाटील राऊत
कोरोना दुसऱ्या लाटेतील नवा कोरोनायोद्धा कौतिकपाडा सरपंच राजूआबा,एका निराधार व्यक्तीचे स्वतः पाणी देऊन केले अंत्यसंस्कार सटाणा,(जगदिश बधान तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
बागलाण तालुक्यातील संवेदनशील गाव अशी ओ ळख असणारे कौतिकपाडा हे गाव..या गावचे सरपंच राजू आबा यांनी कोरोनाचा या दुसऱ्या लाटेत गाव कसे वाचेल त्यासाठी कोरोनाशी दोन हात करण्याची त्यांनी तयारी दाखवली. गावात एक एक करून कोरोना रुग्ण निघायला लागले त्यांनी लागलीच गावात सॅनिटाझर बाटली प्रत्येक घरात वाटली,फवारणी करण्यासाठी ग्रामपंचायततिला कायमस्वरूपी पंप खरेदी केला,मराठी शाळेत दोन खोल्या विलगीकरण कक्ष तयार केले,शासनाच्या सर्व नियमाचे काटेकोर पालन होण्याकडे जातीने लक्ष देतात..
आत्ता तुम्ही म्हणाल हे तर सर्वच ग्रामपंचायत सरपंच करतात पण राजू आबा नि या पुढे जाऊन रुग्णांना स्वतः घेऊन जाऊन डांगसौंदने येथे ऍडमिट करतात,आरोग्य विभागकडून रोज नाव विचारून त्या रुग्णाच्या घरी भेटायला जातात.
दि.21 एप्रिल रोजी दुर्दयवाने कै मीराबाई दातरे यांचे निधन झाले अशा रुग्णाचा अंत्यसंस्कार कसा करणार ही गावाला आणि त्या परिवाराला चिंता असताना स्वतः राजू आबा यांनी ppe किट परिधान केलं आणि अंत्यसंस्कार विधी पूर्ण केला.. त्याच दिवशी गावातील निराधार व्यक्ती यांचं अपघाती निधन झालं त्यांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाणे ,त्यांचे पोस्टमार्टेम करून त्यांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी कौतिकपाडा गावात प्रेत आणलं पुन्हा तोच प्रश्न कोण हा विधी करणार कोरोनामुळे सख्खे नाते लांब जातात हा तर निराधार माणूस होता, गावचे सरपंच या नात्याने राजूआबा यांनी स्वतः घागर उचलली आणि त्या मृत आत्मयस पाणी दिल,आणि तो देह अनंतात विलीन झाला,आपण सरपंच झालो म्हणजे फक्त राजकारणच करायचं,अस न करता राजू आबा यांनी समाजा प्रति देणं लागतो हे दाखवून दिलं,कोरोना काळात माणसं माणसापासून दूर जात असताना आबा यांनी रुग्नाजवळ जाऊन आपली माणुसकी जपता आहेत सलाम त्यांच्या या कार्याला