Home नांदेड मुखेड तालुक्यातील मौजे जाहुर येथे दिव्यांग, वृद्ध, निराधार बांधवांचा मेळावा संस्थापक अध्यक्ष...

मुखेड तालुक्यातील मौजे जाहुर येथे दिव्यांग, वृद्ध, निराधार बांधवांचा मेळावा संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न…

186

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील मौजे जाहुर येथे दिव्यांग, वृद्ध, निराधार बांधवांचा मेळावा संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न…
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे जाहूर येथे दिनांक 10 फेब्रुवारी रोजी दिव्यांग निराधार वृद्ध बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. दिव्यांग निराधार मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष श्री चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलिकर यांनी आपले विचार मांडले.शासनाने अनेक वेळा दिव्यांगाचे कायदा करून सुद्धा अनेक योजना फक्त कागदोपत्रीच असल्याकारणाने त्यांची अंमलबजावणी व्हावी म्हणून नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग निराधार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी अनेक दिव्यांग संघटनेने आंदोलन केले.गाव तिथे शाखा दिव्यांग संघटनेच्या बोर्डाची शाखा स्थापन करून संघटित व्हा आणि संघर्ष केल्याशिवाय न्याय मिळणार नाही.दिव्यांग आणि आपल्या शरीरातील व्यंग असल्यामुळे खचून न जाता दिव्यांग बुद्धीने चातुर्य असून त्या बुद्धीचा वापर करून” दिव्यांग होने का गम नही हम किसीसे कम नही,”हे दाखविण्यासाठी संघर्षाने सामील होऊन आपला हक्क मिळवून घेण्यासाठी संघटित व्हावे शिका ,संघटित व्हा, संघर्ष करा या उक्तीप्रमाणे संघर्ष केल्याशिवाय हक्क मिळत नाही असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी परिसरातील दिव्यांग बांधवांनी मोठी हजेरी लावली होती. यावेळी हेमंत पाटील राजूरकर, राम किशन कांबळे ( तालुकाध्यक्ष), गंगाधर पंदनवाड (अपंग महासचिव मुखेड), बजरंग भाऊराव पाटील पाळेकर, पुंडलिक नागोराव जंगमवाड राजूरकर, माधव सायलू रावण पल्ले, गोपाळ पाटील हिवराळे (प्रहार संघटना तालुका सचिव), लक्ष्मण आत्माराम पाटील बोडके व परिसरातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleसातारा बसस्थानकात सहा शिवशाही बसला अचानक आग
Next articleआंबडस ग्रामपंचायतमध्ये गरजाई परिवर्तन पॅनलचे उमेदवार आणि मनसेचे कार्यकर्ते जयंत शेठ मोरे यांची सरपंच पदी निवड 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.