Home नांदेड कामात केलेली हलगर्जी भोवली, चार शिक्षकांची वेतनवाढ रोखण्याचे दिले गेले आदेश..

कामात केलेली हलगर्जी भोवली, चार शिक्षकांची वेतनवाढ रोखण्याचे दिले गेले आदेश..

138
0

राजेंद्र पाटील राऊत

कामात केलेली हलगर्जी भोवली, चार शिक्षकांची वेतनवाढ रोखण्याचे दिले गेले आदेश..

मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड _ नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिनांक 17 डिसेंबर रोजी मुखेड तालुक्यात पाहणी दौरा केला. यात त्यांनी चांडोळा व चीवळी या गावांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान सीईओ नी चांडोळा जिल्हा परिषद शाळेच्या चार शिक्षकांनी अध्ययन व अध्यापनात हलगर्जीपणा केल्यामुळे त्या शिक्षकांचे वेतन वाढ तात्पुरते बंद करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. तसेच मुखेड येथे पंचायत समिती कार्यालय व तहसील कार्यालयाच्या सभागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीस गैरहजर असल्या बद्दल पंचायत समितीच्या कृषी अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली आहे तसेच कृषी विस्तार अधिकारी यांच्यावर ही कारवाई करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. आढावा बैठकीत सीईओ नी शासनाने राबवित असलेल्या घरकुल योजना पाणीपुरवठा आरोग्यासह विविध योजनांच्या कामासंदर्भात तालुक्याचा आढावा घेतला यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शरद कुलकर्णी सर पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांची उपस्थिती होती. या दौर्‍यात मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता नांदेडगटविकास अधिकारी तुकाराम भालके तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रमेश गवाले गटशिक्षणाधिकारी संतोष शेट कार जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे ये आर चितळे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता पी एल चव्हाण विस्ताराधिकारी शंकर येवते पी एन गर्जे एस पी देवकते हकीम वाघदरे आर आर कुंडलकर सचिन पांढरमिसे कासार सर बी एम पाटील शिवशंकर जपलवाड माकणे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी व ग्रामसेवक ग्रामसेविका आदीं उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here