राजेंद्र पाटील राऊत
कुंटुर पोलिसांनी दिले २६ / ११ हल्ल्यातील शहिदांना रक्तदान करून श्रध्दांजली
नांदेड, दि. २७ – राजेश एन भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क
२६-११-२००८ रोजी समुद्री मार्गे येऊन आतंकवाद्यांनी मुंबईवर भ्याड दहशतवादी हल्ला केला असता त्या आतंकी हल्ल्याचा प्रतिकार करीत असतानाच वीर भारतीय जवान व पोलिस दलातील वीर अधिकारी व कर्मचारी या आतंकी बॉम्ब हल्ल्यात शहीद झाले.
त्या दुःखद आठवणीने आजही सर्व भारतीयांचे उर दाटून आल्या शिवाय राहत नाही.
व त्याच स्मृतीप्रित्यार्थ,त्याच भावनेतून कुंटूर पोलीस स्टेशन येथे सहायक पोलिस निरीक्षक श्री करीम पठाण यांच्या मार्गदर्शना खाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असता सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले रक्तदान करून वीर शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.
या रक्तदान शिबिर कार्यक्रमा वेळी
कुंतुर पोलिस ठाणे स.पो. नि. श्री करीम पठाण,नायब तहसीलदार, पी एस आय एवले, सय्यद बारी व महिला पोलिस कर्मचारी आदी उपस्थित होते.
तरी या स्तुप्त उपक्रमा बद्दल ए पी आय पठाण यांचे सर्व स्तरातून प्रशंसा होताना दिसून आले.