राजेंद्र पाटील राऊत
सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर जंयती
कोल्हापूर : सहकारमहर्षी स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर यांच्या जयंतीनिमित्त पार्वती को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट यड्राव (इचलकरंजी )येथील त्यांच्या समाधीस्थळी मान्यवरांनी भेट देऊन त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जयसिंगपूर नगरीचे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, आदित्य पाटील-यड्रावकर आणि यड्रावकर परिवारातील सर्व सदस्यांनी सर्वप्रथम स्वर्गीय शामराव आण्णांच्या समाधीचे दर्शन घेत समाधीस्थळी पुष्पगुच्छ अर्पण करुन शामराव आण्णा यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
त्यानंतर शरद साखर कारखान्याच्या कार्यस्थळी असलेल्या स्वर्गीय शामरावआण्णा यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास कारखान्याचे चेअरमन राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी जेष्ठ नेते आण्णा शांताप्पा चौगुले यांच्या सह शरदचे संचालक उपस्थित होते,
गजानन सुलतानपूरे, सुभाषसिंग रजपूत, प्रकाश पाटील- टाकवडेकर रावसाहेब भिलवडे, प्राचार्य अनिल बागणे, प्रा.आण्णासाहेब क्वाणे, संजय बोरगावे, अजित उपाध्ये,प्रकाश अकीवाटे, आप्पासाहेब बडबडे, महावीर खवाटे, ताजुद्दीन तहसीलदार, थबा कांबळे, नगरसेवक संभाजी मोरे, प्रेमला मुरगुंडे, राजेंद्र झेले, अर्जुन देशमुख, रजनीकांत कांबळे, महेश कलकुटगी, गुंडाप्पा पवार, दादासो पाटील चिंचवाडकर, यांच्यासह अनेक मान्यवरांनी समाधीस्थळी भेट देऊन शामराव पाटील यड्रावकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .