*सकल मराठा समाजाची जिल्हास्तरीय बैठक कोल्हापूरात*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)*
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्यात सर्वच ठिकाणी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात सकल मराठा समाजाची जिल्ह्यास्तरीय बैठक गुरुवारी धैर्यप्रसाद हॉल येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. या बैठकीत जिल्ह्याच्या सर्व भागातून मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करणारे कार्यकर्ते, ज्येष्ठ मार्गदर्शक, मराठा अभ्यासक, लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याबरोबरच पोलिस भरती, स्पर्धा परीक्षेतून नोकर भरती, शैक्षणिक प्रवेशातील मराठा आरक्षण, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक, सारथी संस्थेबाबतचे प्रश्न या सारख्या महत्त्वाच्या विषयावरही चर्चा होणार आहे. अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी वंसत मुळीत म्हणाले, “मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश, शासकीय नोकरीमधील भरती थांबली आहे. विविध शासकीय विभागामध्ये पूर्वी मराठा आरक्षणातून भरती झाली. मात्र स्थगितीचा निर्णय दिल्याने निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाही. त्यांची नियुक्ती होणे. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधी, छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेची स्वयत्ता. छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक अशा अनेक प्रश्नांवर चर्चा होणार आहे. या बैठकीला कोल्हापूर शहरासह १२ तालुक्यातून आणि नगरपालिका शहरातील मराठा समाजील विद्वान, ज्येष्ठ मार्गदर्शक, कायदे अभ्यासक सहभागी होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनचे सर्व नियम पाळूनच ही बैठक होणार आहे.
या पत्रकार परिषदेला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी. अध्यक्ष अँड.गुलाबराव पाटील, दिलीप देसाई, हर्षल सुर्वे, संदिप देसाई, धनंजय सावंत, शाहीर दिलीप सावंत, महादेव पाटील, शंकरराव शेळके, प्रताप नाईक, अवधूत पाटील, विकास जाधव, अँड.उदय जाधव, युवराज जाधव, मयुर पाटील, शैलजा भोसले आदी उपस्थिती होते .