*हाथरस प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी आरपीआयचे कळवणला निवेदन सादर* कळवण,( बाळासाहेब निकम तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- उतर प्रदेशातील हाथरस येथील चंदपा गावातील दलित मुलीवर अत्याचार करणारे नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा होणे बाबत कळवण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन देताना आरपीआय चे तालुका अध्यक्ष बापुसाहेब जगताप,उपाध्यक्ष परशुराम बस्ते, युवा अध्यक्ष सुबोध गांगुडॅ, आण्णा शिंद जेष्ठ कार्यकर्त,शहर अध्यक्ष विलास बस्ते, उपअध्यक्ष भारत आहिरे, एकनाथ वणीस, संपर्कप्रमुख भाऊसाहेब खरे उत्तर प्रदेशातील हाथरस येथील चंदपा गावातील दलित मुलीवर दिंनाक १४ सप्टेंबर रोजी सामुहिक बलात्कार करुन बेदम मारहाण करण्यात आली तसेच तिची जीभ कापून टाकली दोन दिवसापूर्वी पिडीतेचा उपचार दरम्यान दुदैर्वाने मृत्यू झाला माञ यापिडीतेचा मृत्यू नंतर तिचा मृत्यदेह कुटूबाकडे न देता पोलीसांनी तीच्यावर अंत्यसंस्कार केले तसेच घटना घडल्यानंतर देखील पोलीसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले या घटनेचा रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले गट) च्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला या गुन्ह्याचा तपास फास्ट टृक न्यायालयात खटला चालवावा व गुन्हेगारांना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आरपिआय माफॅत करण्यात आली