*मिणचे गावात सदावर्तेचा जाहीर निषेध*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*
हातकणंगले तालुक्यातील मिणचे गावात सदावर्ते यांच्या बेताल वक्तव्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त केला.
सदावर्ते याने छत्रपती संभाजीराजे राजे यांचेबद्दल जे वक्तव्य केले त्याचा जाहीर निषेध. अफजलखानाची अवलाद म्हणजे काय? हे माहीत असुन सुध्दा बेताल वक्तव्य असताना जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने व ज्या आंदोलनामुळे जगामध्ये आदर्श ठरले ते कुठे तरी हिंसक बनावे आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडावे या उद्देशाने केले आहे. शासन व प्रशासन यांनी सदावर्ते याच्यावर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, शांतता भंग होईल असे वक्तव्य करणे. यासंदर्भातील कारवाई करावी. मराठा समाज आपल्या हक्कासाठी लढा देत आहे,तोही शांततेत याचा गैरफायदा घेणेचा प्रयत्न होउ नये कारण मराठा समाजमनातील खदखद बाहेर पडणेस वाट करुन देऊ नका ,असंतोष फार मोठा आहे. होणारा उद्रेक फार मोठा असेल. आमच्या अस्मितेला हात घालणेचा जो प्रयत्न होत आहे तो वेळीच थांबला पाहिजे. त्याचप्रमाणें प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा राजेच्या बद्दल वक्तव्य करून छ.शाहु महाराज यांचाच नाहीतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही अपमान केला आहे.
याच निषेधार्त मिणचे गावात सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी मिणेचे गावातील मराठा समाज उपस्थित होते.