कुलाब्यातील ज्वेलर्सचा “मराठी त बोलण्यास नकार, मराठी लेखिकेचे दुकाना बाहेर अन्नपाण्याविना ठिय्या आंदोलन
विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे
दि.९ – ‘महावीर ज्वेलर्स’ या दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार देऊन अरेरावी केल्याने मराठी रणरागिणी शोभा ताई देशपांडे यांनी दुकानाबाहेर ठिय्या मांडला आहे.
शोभा ताई देशपांडे या लेखिका आहेत. मराठी भाषेवर त्यांचे अतोनात प्रेम असून त्या मराठीचा नेहमी आग्रह धरत असतात. त्यातूनच महावीर ज्वेलर्स दुकानाच्या गुजराती मालकासोबत त्यांचे खटके उडाले. मराठी माणसाचा अपमान केला गेला म्हणून आंदोलन करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मराठी भाषेत बोलण्यास नकार देणाऱ्या मुंबईतील ज्वेलर्सच्या दुकानासमोर मराठी लेखिकेने ठिय्या मांडला आहे. वयाची पंचाहत्तरी पार केलेल्या शोभा ताई देशपांडे यांनी दुकानदाराच्या आडमुठेपणाविरुद्ध आंदोलन पुकारले आहे.
कुलाब्यासारख्या दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू भागात हा प्रकार उघडकीस आला आहे. ‘महावीर ज्वेलर्स’ या दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार देऊन अरेरावी केली, दुकानाचा परवाना दाखवण्यास मनाई केली पोलिसांना बोलवून अपमानित केले, असा आरोप करत शोभा ताई देशपांडे यांनी दुकानाबाहेर ठिय्या मांडला. कुलाब्यातील ज्वेलर्सचा मराठीत बोलण्यास नकार, मराठी अपमानित केले, असा आरोप करत शोभा ताई देशपांडे यांनी दुकानाबाहेर ठिय्या मांडला.
दुकानदार आणि पोलिसांनी दुकानाबाहेर काढल्यावरुन देशपांडे ताई ह्यांनी काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून दुकानासमोर ठाण मांडून बसल्या. पोलिसांनी अपमानित केले म्हणून मुंबई पोलीस आयुक्त स्वतः जोपर्यंत येत नाहीत आणि दुकानदार परवाना दाखवत नाही, तोपर्यंत दुकानासमोरुन न हलण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
त्यांचे वय ७५ पेक्षा जास्त असून शोभा देशपांडे अन्नपाण्याविना एकाच जागी जवळपास सात तासाहून अधिक काळ आंदोलन करत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.