अजमीर सौंदाणेत गुणगौरव सोहळा संपन्न सटाणा,(जगदिश बधान ग्रामीण तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
आज बुधवार दि. ७ ऑक्टोबर २०२० रोजी जि.प.प्राथ.शाळा,अजमीर सौंदाणे ता. बागलाण , जि. नाशिक येथे ग्राम पंचायत अजमीर सौंदाणे, शाळा व्यवस्थापन समिती अजमीर सौंदाणे, ग्रामस्त, पालकवर्ग यांच्या उपस्थितीत
श्रीम. भाग्यश्री साहेबराव देवरे व श्रीम. माधुरी सुभाष पवार या शिक्षिकांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
श्रीम. माधुरी सुभाष पवार यांना जीवन गौरव यांच्यातर्फ आयोजित, राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता.ग्राम पंचायत अ. सौंदाणे तर्फ श्रीम.पवार मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.
श्रीम. भाग्यश्री साहेबराव देवरे यांना आम्ही तंत्रस्नेही शिक्षकमंच, महाराष्ट्र राज्य समूहातर्फ आयोजित शिक्षक काव्यगायन/काव्यअभिवाचन स्पर्धत परिक्षकांचे सरासरी मूल्यांकनावरुन राज्यातून द्वितीय क्रमांक पटकावला.
ग्राम पंचायत अ. सौंदाणे तर्फ श्रीम. देवरे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्या. पगारे सर यांनी केले.श्रीम. माधुरी पवार व श्रीम. भाग्यश्री देवरे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. मा.सरपंच श्री.धनंजय आबा पवार यांनी शाळेविषयी गोडकौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आजच्या कार्यक्रमप्रसंगी श्री. धनंजय (आबा) पवार – सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती, अ.सौंदाणे अध्यक्ष श्री. जगदीश बधान यांनी भ्रमणध्वनी व्दारे संपर्क करुन शुभेच्छा दिल्या. तसेच श्री.प्रकाश मगर, श्री.केदा मोरे ( विविध कार्यकारी सेवा सोसायटी व्हॉइस चेअरमन ) , श्री.योगेश बागुल , श्री.संतोष पगार , मुख्याध्यापिका सौ.बेबीबाई देवरे (देवळाणे) , श्री. मुरलीधर पवार ( देवळाणे), श्री.यशवंत पवार ( सुराणे ), श्री.शिवाजी गंगावणे, श्री.बाबुलाल माळी, श्री. दिगंबर देवरे.
श्री. दादाजी पगारे – मुख्याध्यापक ,अ. सौंदाणे, ज्येष्ठ शिक्षक श्री. भिकन विधाते , तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.