*सटाणा कडून मालेगाव कडे जाणारी अवजड वाहतूक बंद करा अशी मागणी*✍️( राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज )
सटाणा-मालेगाव मार्गे सुरत कडून नगरकडे जाणारी आवजड वाहातुक बंद करण्याबाबत आज श्री अरुण दादा शिरोळे जिल्हाप्रमुख यशवंत सेना नाशिक यांनी आपली विनंती आमदार श्री दिलीप बोरसे साहेब यांना अर्जाद्वारे केली.
गुजरात कडून अहमदनगर कडे जाणारी आवजड वाहातुक ही चांदवड-मानमाड मार्गे जाते परंतु चांदवड जवळील टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणावर टोल भरावा लागतो म्हणून हा टोल वाचविण्यासाठी हे आवजड वहाने सटाणा-शेमळी-ब्राम्हणगाव-धांद्री-लखमापुर-आघार-दाभाडी-मालेगाव मार्गे ही आवजड वहाने या मार्गाने जातात, परिणामी या रस्ताल्या दररोज कुठल्या ना कुठल्या ठिकाणी आक्सीडेंट होत राहतात हे वाढते आँक्सिडेंट चे प्रमाण: पाहात या मार्गाने जाणारी आवजड वाहाणाची वाहातुक बंद करावी अशी विनंती आज श्री अरुण दादा शिरोळे जिल्हाप्रमुख यशवंत सेना यांनी आमदार श्री दिलीप बोरसे साहेब यांना अर्जाद्वारे केली.