*विना मास्क फिरणाऱ्यांवर 57 हजारावर दंड वसुल*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*
कोल्हापूर शहरात विना मास्क फिरणाऱ्या 247 नागरिकांकडून महानगरपालिकेच्या पथकांनी आज 57 हजार 300 रुपयांच्या दंडाची कारवाई केली, असल्याची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.
नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करुन महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, कोरोनाला रोखण्यासाठी महापालिका प्रशासन युध्दपातळीवर उपाययोजना राबवित आहे, नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे
पालन करुन महापालिका प्रशासनास सहकार्य करावे. यापुढील काळातही विना मास्क फिरणाऱ्यांवर तसेच हँड ग्लोव्हज शिवाय भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
महानगरपालिका प्रशासनाने विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी विशेष पथके तैनात केली असून आज दिवसभरात या पथकांनी शहरात विना मास्क फिरणाऱ्या 247 नागरिकांकडून 57 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये केएमटी कर्मचाऱ्यांकडून 147 नागरिकांकडून 17 हजार 800 रुपयांचा तर इस्टेट विभागाकडून 20 जणांकडून 25 हजार 500 रुपयांचा, विभागीय कार्यालय क्रं. 4 कडून 70 जणांकडून 12 हजार रुपयांचा तर विभागीय कार्यालय क्रं.3 कडून 10 जणांकडून 2 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. याबरोबरच सायंकाळी 7 नंतर दुकाने सुरु ठेवल्याबद्दल 8 दुकानदाराकडून 2 हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आल्याची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.