*व-हाणेत आढळले आठ कोरोनाबाधित रुग्ण;उद्यापासून लाँकडाऊन*
*व-हाणे,(युवा मराठा न्युज नेटवर्क)- नाशिकच्या मालेगांव तालुक्यातील व-हाणे गावात कोरोनाबाधित आठ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
या गावातील काही लोक हे बाहेरगावी वास्तव्यास राहत असल्याने व अधून मधून ते गावात येत असल्यामुळे कोरोनाचा शिरकाव या गावात जलदगतीने झाला असल्याची भिती व्यक्त केली जात आहे,शिवाय गावातील बहुतांशी मजूर वर्ग हा बाहेरगावी कामाला जात असल्याने कोरोनाचा झपाटयाने फैलाव या गावात होताना दिसत आहे,परिणामी उद्या दिनांक १सप्टेंबर मंगळवारपासून संपूर्ण गाव लाँकडाऊन केले जाणार असल्याचा निर्णय व-हाणे ग्रामस्थांनी घेतला आहे,