Home चंद्रपूर चंद्रपूरमध्ये स्वयंघोषित “पंतप्रधान”चा थरार! पोलिसांचे बॅरिकेड तोडून चारचाकीने पळ

चंद्रपूरमध्ये स्वयंघोषित “पंतप्रधान”चा थरार! पोलिसांचे बॅरिकेड तोडून चारचाकीने पळ

169

आशाताई बच्छाव

1002753933.jpg

चंद्रपूरमध्ये स्वयंघोषित “पंतप्रधान”चा थरार!
पोलिसांचे बॅरिकेड तोडून चारचाकीने पळ
चंद्रपूर | प्रतिनिधी आनंद खजांची 
चंद्रपूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःला देशाचा “पंतप्रधान” म्हणवून घेणाऱ्या महादेव गुलाबराव आसेकर या व्यक्तीने पोलिसांनी लावलेले बॅरिकेड तोडून चारचाकी वाहनासह पळ काढल्याची घटना घडली आहे.
सदर व्यक्तीने आपल्या वाहनावर “पंतप्रधान भारत” असा मजकूर लिहिला असून, स्वतःच्या लेटरपॅडवरून नागपूर येथील पोलिस आयुक्तांना पत्र देत पोलिस संरक्षण आणि पिस्तुल परवान्याची मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये कुतूहल आणि संभ्रमाचे वातावरण आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे.
स्वयंघोषित पदाचा गैरवापर, शासकीय नावाचा वापर आणि बॅरिकेड तोडल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous articleदहीवड येथे पत्रकारावर जीवघेणा हल्ला
Next articleEpaper yuva maratha 1 march 2026
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.