Home गुन्हेगारी दहीवड येथे पत्रकारावर जीवघेणा हल्ला

दहीवड येथे पत्रकारावर जीवघेणा हल्ला

1379

Yuva maratha news

1002732859.jpg

दहीवड येथे पत्रकारावर जीवघेणा हल्ला
पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ल्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळख असलेल्या पत्रकारांना वार्तांकन करतांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो आहे.
दहिवड येथे दिनांक 21/02/2026 रोजी सार्वजनिक ठिकाणी वार्तांकन करतांना पत्रकार युवराज देवरे यांच्यावर अज्ञात समाजकंटक कडून जीवघेणा हल्ला करण्यात आला.सकाळी अंदाजे 10 च्या सुमारास हा पूर्वनियोजित हल्ला झाला.जातीवाचक शिवीगाळ,मारून टाकण्याच्या धमक्या मोठ्या प्रमाणात तसेच गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न एका मोठ्या समुदायाकडून करण्यात आला.
त्या अनुषंगाने आज देवळा पोलिस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली.परिसरातील सी सी टीव्ही फुटेज तपासून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत संबंधित दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Previous articleEpaper Yuva maratha 22 February
Next articleचंद्रपूरमध्ये स्वयंघोषित “पंतप्रधान”चा थरार! पोलिसांचे बॅरिकेड तोडून चारचाकीने पळ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.