Home नाशिक मालेगाव महानगरपालिका निवडणूक “बदल हवा तर चेहरा नवा” — आंशूराज राऊतांच्या रूपाने...

मालेगाव महानगरपालिका निवडणूक “बदल हवा तर चेहरा नवा” — आंशूराज राऊतांच्या रूपाने सामान्यांचा आवाज बुलंद

164

आशाताई बच्छाव

1002382909.jpg

“बदल हवा तर चेहरा नवा” — आंशूराज राऊतांच्या रूपाने सामान्यांचा आवाज बुलंद.                          मालेगाव: प्रतिनिधी विजय चांदणे 

प्रभाग क्रमांक १० मध्ये राजकारणाचा चेहरा बदलण्याची जोरदार चर्चा सुरू असून, राष्ट्रीय मराठा पार्टीचे अधिकृत उमेदवार आंशूराज राजेंद्र राऊत हे नाव आज सर्वसामान्यांच्या ओठांवर आहे. जनतेचा विश्वास, तरुणाईची साथ आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांची ठाम मांडणी यामुळे ते वेगाने लोकनेते म्हणून पुढे येत आहेत.

कुठलाही राजकीय वारसा नसताना, कुठल्याही सत्तेची पाठराखण नसताना फक्त कष्ट, प्रामाणिकपणा आणि जनतेच्या बळावर उभा राहिलेला हा तरुण चेहरा आज प्रस्थापित राजकारणाला थेट आव्हान देत आहे. रस्त्यावरील समस्या असोत, पाणी–रस्ते–स्वच्छता असो वा अन्यायग्रस्तांचा आवाज — आंशूराज राऊत नेहमीच पुढे राहिले आहेत.

अन्यायाविरुद्ध आक्रमक भूमिका, विकासासाठी ठोस दृष्टी आणि जनतेशी थेट संवाद हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच “नेता बनवलेला नाही, तर जनतेतून घडलेला नेता” अशी ओळख त्यांना मिळत आहे.

तरुणाईचा उत्साह, सामान्य नागरिकांचा विश्वास आणि बदलाची ठाम भूमिका घेऊन “सर्वसामान्यांचा नेता” म्हणून आंशूराज राजेंद्र राऊत प्रभाग क्रमांक १० मध्ये नव्या राजकारणाची सुरुवात करण्यास सज्ज आहेत.

आता प्रश्न एकच —

जुना कारभार की नवा बदल?
बदल हवा असेल, तर हाच नवा चेहरा!

Previous articleYuva-Maratha-21-Dec-to-27-Dec-2025
Next articleपालघर जिल्ह्यात घरकुल लाभार्थ्यांचा गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.