Home नाशिक चाळीसगाव फाट्यावर लोकशाही धडक मोर्चाच्या रास्तारोको आंदोलनास प्रचंड प्रतिसाद

चाळीसगाव फाट्यावर लोकशाही धडक मोर्चाच्या रास्तारोको आंदोलनास प्रचंड प्रतिसाद

78

आशाताई बच्छाव

1002335514.jpg

मालेगाव (प्रतिनिधी आंशूराज पाटील राऊत): तालुक्यातील सायने पंचक्रोशी सह हजारो शेतकरी बांधवांची जमीन न्यू मनमाड इंदोर रेल्वे लाईन साठी भूसंपादन व जमीन मोजणीच्या कामास सुरुवात झाली असून या विरोधात हजारो शेतकरी बांधव आज सोमवार रोजी दि.15 रोजी चाळीसगाव फाटा येथे लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखर दादा पगार व न्यू मनमाड इंदूर रेल्वे लाईन संघर्ष समितीचे प्रमुख अध्यक्ष सुनील सोनू शिंदे यांच्या सह हजारो प्रकल्प प्रकल्प बाधित शेतकऱ्याने तर्फे रास्ता रोको आंदोलन छेडण्यातआले. तालुक्यातील मौजे सायने पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांची मालकीची शेत जमीन बिनशेती करून नवीन इंदूर मनमाड रेल्वे कामासाठी संपादित केले जाणार असल्याच्या भूमिकेतून सदर जमिनीचे लेआउट व व्यापारी संकुल व कॉम्प्लेक्स केले जाणार आहेत , या पूर्वीच सदर जमिनीचे अनेक पावरलूम कंपन्या विकसित झाल्या आहेत. सायने परिसरातील मालेगाव, चाळीसगाव या मुंबई आग्रा महामार्गावर जमीन संपादित करण्याचे काम सध्यासुरू झाले आहे .सन 2013 मध्ये सदर जमिनीचे भाव प्रति हेक्टरी कोट्यावधी रुपयाचा तुलनेत जाहीर झाला असताना, आता मात्र कवडीमोल मात्र दरात सदर जमीन खरेदी करण्याचे उद्योग सुरू झाले आहेत यामुळे संतप्त अनेक शेतकऱ्यांची विहीर ,रहिवास निवास, कांदा चाळ, गोठा व इतर अनेक मूल्यांकन जमीन देखील नामा मात्र दराच्या भावाने आकारणे सुरू झाले असल्याच्या पार्श्वभूमीवर सदर शेतकऱ्यांना भरपाई मिळून देण्यासाठी व तसेच जबरदस्तीने जमीन संपादन व मोजणीचा प्रयत्न झाल्यास लोकशाही धडक मोर्चा संस्थापक अध्यक्ष शेखर पगार, संघर्ष समिती चे सुनील सोनू शिंदे यांच्यासह यांच्यासह हजारो प्रकल्प बाधित शेतकऱ्यांतर्फे केला आहे या आंदोलनात देवाची अहिरे रामदास शिंदे देविदास सावंत मनोहर शेवाळे निंबा पगार प्रकाश शेवाळे दिलीप शेवाळे कैलास पाटील विवेक पाटील अनिल शेवाळे वसंत सावंत दामू बच्छाव नानाजी सावंत प्रशांत बच्छाव युवराज कदम शांतीलाल सावंत अशोक हिरे आदींचे शेतकऱ्यांतर्फे देण्यात आला आहे

Previous articleराज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचे बिगूल वाजले.
Next articleराजोली येथे तालुकास्तरीय बाल संमेलन उत्साहात संपन्न!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.