Home जालना राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी मोठी गर्दी केल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह उफाळून आला. महापालिकेत आमच्या शिवाय ...

राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी मोठी गर्दी केल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह उफाळून आला. महापालिकेत आमच्या शिवाय  महापौर होणार नाही ~अरविंद चव्हाण 

37

आशाताई बच्छाव

1002207657.jpg

राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी मोठी गर्दी केल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह उफाळून आला.

महापालिकेत आमच्या शिवाय  महापौर होणार नाही ~अरविंद चव्हाण

जालना: दिलीप बोंडे ब्युरो चीफ/
महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट) दोन अंकीचा आकडा पार केल्याशिवाय राहणार नाही, आणि आमच्या शिवाय कोणत्याही पक्षाला महापौर करता येणार नाही असा दावा जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आ.अरविंदराव चव्हाण यांनी केला. रविवार रोजी
इच्छुकांनी मोठी गर्दी केल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह उफाळून आला.
जालना शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रविवार रोजी जिल्हा पक्ष कार्यालय येथे जालना महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी आणि इच्छूक उमेदवारांना पक्षाचे उमेदवारी अर्ज वितरण करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी श्री चव्हाण बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे शिव,शाहू, फुले आंबेडकर यांच्या समतेच्या विचाराशी प्रेरित होऊन पक्ष संघटना उभी करत आहे. त्यांच्या या धर्मनिरपेक्ष विचारामुळे समाजातील सर्व समाज घटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहे.
आगामी महापालिकेच्या निवडणुकीत पक्षातील सर्व समाज घटकातील कार्यकर्त्यांना पक्षाची उमेदवारी देऊन न्याय देण्याचे आश्वासन श्री. चव्हाण यांनी यावेळी दिले. जालना शहराचा सर्वांगीण विकास होऊन शहर स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी आमचा पक्ष कटिबद्ध राहील असे श्री चव्हाण यांनी सांगितले.
   
   पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्ते अग्रेसर ~ शेख मेहमूद 

 जालना शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस

Previous articleजालन्यात शिवसेनाप्रमुखांना अभिवादन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.