आशाताई बच्छाव
भाजपाकडून नव्या चेहऱ्याला संधी: नगराध्यक्ष पदासाठी प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांचे नामांकन दाखल. गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ
नगराध्यक्ष पदासाठी भाजपाने नव्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांना उमेदवारी दिल्यानंतर आज त्यांनी औपचारिकपणे आपले नामांकन दाखल केले. पक्षाच्या उच्चस्तरीय चर्चेनंतर त्यांचे नाव अंतिम होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
नामांकन करताना निंबोरकर यांच्यासोबत मोठा समर्थक वर्ग उपस्थित होता. त्यांच्या उमेदवारीमुळे शहर राजकारणात नवीन ऊर्जा निर्माण झाल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. काही स्थानिक राजकीय वर्तुळांमध्ये भाजपाच्या या निर्णयामुळे इतर पक्षांमध्ये तगडी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नामांकनानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आपला आनंद व्यक्त केला. नव्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षाने पुढील निवडणूक जोरदारपणे लढवण्याचा निर्धार केल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
प्रणोती निंबोरकर यांनी नागरिकांच्या विकासकामांना प्राधान्य देत शाश्वत आणि गतिमान प्रशासन देण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.






