Home गडचिरोली भाजपा युवा मोर्चा गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी जाहीर; विस्ताराला नवी धार, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...

भाजपा युवा मोर्चा गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी जाहीर; विस्ताराला नवी धार, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवा शक्ती सज्ज

54

आशाताई बच्छाव

1002207535.jpg

भाजपा युवा मोर्चा गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी जाहीर; विस्ताराला नवी धार, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवा शक्ती सज्ज

 

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ:भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे यांच्या आदेशानुसार भारतीय जनता युवा मोर्चा गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

नवनियुक्त कार्यकारिणीच्या नेतृत्वाची जबाबदारी भाजपा युवा मोर्चा गडचिरोली जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर यांच्याकडे सोपविण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा अधिक सक्षम आणि संघटित होईल, असा विश्वास जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केला.

गडचिरोलीसारख्या महत्त्वाच्या व आव्हानात्मक जिल्ह्यात भाजपा विचारधारा घराघरात पोहोचविण्यासाठी युवा मोर्चा निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त करत प्रा. बारसागडे म्हणाले की, ही कार्यकारिणी पक्ष विस्ताराला निश्चितच नवे बळ देईल.

ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन, युवा नेतृत्वाला बळ

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती खालील ज्येष्ठ व मान्यवर नेत्यांच्या मार्गदर्शनात पार पडली —

मा. डॉ. अशोकजी नेते, माजी खासदार

डॉ. मिलिंदजी नरोटे, आमदार, गडचिरोली विधानसभा

राजे अंब्रशीराव महाराज आत्राम, माजी मंत्री

अरविंद सावकार पोरेडडीवर

डॉ. देवराव होळी, माजी आमदार

डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार

कृष्णा भाऊ गजबे, माजी आमदार

प्रशांत भाऊ वाघरे, माजी जिल्हाध्यक्ष

मान. प्रकाश सावकार पोरेडडीवर

किसनजी नागदेवे, माजी जिल्हाध्यक्ष

बाबुरावजी कोहळे, माजी जिल्हाध्यक्ष

प्रमोदजी पिपरे

ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे

डॉ. चंदा कोडवते

या मान्यवरांनी नवनियुक्त युवा पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून आगामी आव्हानात्मक काळात अधिक जोमाने कार्य करण्याच्या शुभेच्छा दिल्या.

निवडणुका दारात; युवा मोर्चा सज्ज

गडचिरोली जिल्ह्यात स्वराज संस्था, जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कार्यकारिणी अधिक महत्त्वाची ठरत आहे.
जिल्हा अध्यक्ष मधुकर भांडेकर यांनी युवा मोर्चा संपूर्ण ताकदीने मैदानात उतरून भाजपाच्या धोरणे, विकासकार्य आणि दृष्टिकोन जनतेपर्यंत पोहोचवेल, असा विश्वास व्यक्त केला.

युवा कार्यकर्त्यांनी पक्षाचे कार्य अधिक वेगाने व प्रभावीपणे राबवून आगामी निवडणुकांत भाजपाला भक्कम यश मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.