आशाताई बच्छाव
विवेकानंदनगरमध्ये आमदार डॉ. मिंलिंदजी नरोटे यांची भेट — नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्वरित निराकरणाचे आश्वासन
गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ—
आज आमदार डॉ. मिंलिंदजी नरोटे यांनी गडचिरोली शहरातील विवेकानंदनगर परिसराला भेट देत स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला. या संवादादरम्यान नागरिकांनी परिसरातील नाली व सांडपाणी व्यवस्थेच्या अडचणी मांडल्या.
स्थळपरीक्षणादरम्यान आमदार डॉ. नरोटे यांनी समस्या प्रत्यक्ष पाहून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली व या भागातील नाली व सांडपाणी व्यवस्थेचे काम लवकरात लवकर हाती घेण्याचे आश्वासन दिले.
त्यांनी सांगितले की, “नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही. विवेकानंदनगर परिसरातील सांडपाणी व स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा आमचा निर्धार आहे.”
या भेटीदरम्यान स्थानिक नागरिकांनी आमदारांचे स्वागत करत त्यांच्या सक्रिय कामकाजाचे कौतुक केले. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर त्वरित कृती करण्याची आमदारांची कार्यपद्धती लोकांना दिलासा देणारी ठरली आहे.






