आशाताई बच्छाव
भाजपाचे हर्षल गेडाम यांचा प्रभाग क्र. २ मध्ये घरोघरी जनसंपर्क — जनतेचा जबरदस्त प्रतिसाद!
भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ता हर्षल गेडाम यांनी प्रभाग क्र. २ मध्ये घरोघरी भेट देत नागरिकांशी संवाद साधला.
लोकांच्या दैनंदिन अडचणी जाणून घेत, विकासकामांसाठी ठोस आश्वासन देत त्यांनी जनतेचा विश्वास जिंकला आहे.
गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ –हर्षल गेडाम यांनी या जनसंपर्क मोहिमेदरम्यान सांगितले की,
> “मी भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीवर पूर्ण निष्ठा ठेवून,
‘सबका साथ, सबका विकास’ या ध्येयाने प्रभागातील सर्व समाजघटकांना न्याय देणारे काम करीन.
स्वच्छ, सुजलाम–सुफलाम आणि सुरक्षित प्रभाग निर्माण करणे हे माझे उद्दिष्ट आहे.”
स्थानिक नागरिकांनी हर्षल गेडाम यांच्या कार्यशैलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांना नगरसेवकपदासाठी भाजपा उमेदवार म्हणून संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्र. २ मध्ये मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार जनतेसमोर त्यांनी व्यक्त केला.
हर्षल गेडाम यांच्या नेतृत्वाखाली प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून,
जनतेतून “आमचा नगरसेवक — हर्षल गेडाम” अशी घोषणा घुमू लागली आहे.






