आशाताई बच्छाव
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मौशिखांब येथे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांचा बूथ प्रमुखांसोबत संवाद
मौशिखांब,/गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मौशिखांब येथे आज आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या उपस्थितीत बूथ प्रमुखांची महत्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी बूथ संघटन अधिक मजबूत कसे करता येईल, यावर सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले. “प्रत्येक बूथ हा आपल्या विजयाचा पाया आहे, आणि कार्यकर्ताच पक्षाचा खरा आधारस्तंभ आहे,” असे आमदार डॉ. नरोटे यांनी यावेळी सांगितले.
चर्चेदरम्यान गावातील नागरिकांनी मांडलेल्या विविध स्थानिक समस्या, विकासकामांच्या गरजा आणि जनतेच्या अपेक्षा यांचा देखील आढावा घेण्यात आला. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याबाबतही चर्चा झाली.
आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी कार्यकर्त्यांना संदेश देताना सांगितले की, “निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. एकजुटीने, शिस्तबद्ध पद्धतीने आणि जनतेच्या विश्वासावर आधारित कार्य केल्यास पक्षाचा झेंडा नक्कीच अधिक उंच फडकवता येईल.”
या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकीसाठी सर्वांनी नव्या जोमाने तयारीला सुरुवात केली आहे.






