आशाताई बच्छाव
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजसेवी संस्थेकडून रक्तदान शिबिराचे आयोजन
३४ रक्तदात्यांनी रक्तदान करून जोपासली सामाजिक बांधिलकी
गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ:
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, शाहूनगर गडचिरोली यांच्या वतीने गानली समाज सभागृह, गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. संजय सराटे, कार्यकारी अभियंता (प्रशासन), महावितरण मंडळ गडचिरोली यांच्या हस्ते झाले.
अध्यक्षस्थानी श्री. हितेश पारेख, कार्यकारी अभियंता, महावितरण विभाग गडचिरोली होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. नितीन संगिडवार, अध्यक्ष, अखिल भारतीय गानली समाज संघटना, जिल्हा गडचिरोली, तसेच सौ. ममताताई कोतपल्लीवार, सदस्या, गानली समाज शिक्षण व कल्याण मंडळ, गडचिरोली उपस्थित होत्या.
या शिबिरात एकूण ३४ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. गडचिरोली जिल्हा रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने, समाजातील लोकांनी पुढे येऊन रक्तदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रविंद्र आयतुलवार यांनी केले.
प्रास्ताविक श्री. रंजन बल्लमवार यांनी तर आभारप्रदर्शन श्री. आतिफ खान यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. रंजन बल्लमवार, श्री. सुधीर नकटुजी चौधरी, श्री. अविदास सावसाकडे, श्री. आतिफ खान, श्री. रविंद्र आयतुलवार, श्री. स्नेहल संतोषवार, श्री. दिनेश खारकर, श्री. निकेश निकुरे, श्री. सुधीर योगाजी चौधरी, सौ. सोनीताई संगीडवार, सौ. स्मिता बल्लमवार, श्री. रोशन गुरूकार, श्री. विवेक परचाके आणि श्री. धनराज अहीरकर यांनी मोलाचे प्रयत्न केले.






