Home गडचिरोली राकेशभाऊ गोलेपल्लीवार यांची भारतीय जनता पार्टी तालुका सावली मंडळाच्या उपाध्यक्ष पदावर निवड

राकेशभाऊ गोलेपल्लीवार यांची भारतीय जनता पार्टी तालुका सावली मंडळाच्या उपाध्यक्ष पदावर निवड

51

आशाताई बच्छाव

1002034231.jpg

राकेशभाऊ गोलेपल्लीवार यांची भारतीय जनता पार्टी तालुका सावली मंडळाच्या उपाध्यक्ष पदावर निवड       गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

सावली तालुक्यातील जिबगांव येथील सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले तसेच जनतेच्या हक्कासाठी, शासकीय योजना सामान्य जनतेला मिळावी यासाठी सतत प्रयत्न करणारे मा.राकेशभाऊ मधुकर गोल्लेपल्लीवार यांची भारतीय जनता पार्टीच्या सावली मंडळाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल तालुक्यात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रभक्तीचा विचार तसेच शेवटच्या व्यक्तीचा कल्याणाचा विचार घेवून देशसेवेसाठी कार्यरत राजकीय पक्ष आहे. सावली मंडळाच्या ग्रामीण भागात भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याची मोठी जबाबदारी या माध्यमातुन आपणावर आली आहे. आपण भाजपाचे सच्चे सैनिक आहात. ही जबाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडाल याचा मला विश्वास आहे. विश्वगौरव मा. श्री. नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने तसेच राज्यातील मा. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने घेतलेले लोकाभिमुख निर्णय जनतेपर्यंत पोहचवत भाजप आणि जनता यांच्यातील नाते आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आपण अधिक दृढ कराल याचा मला विश्वास आहे. आपल्या या नव्या जबाबदारीच्या यशस्वीतेकरिता माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा !

सदर पद हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री.किशोर भाऊराव वाकुडकर यांनी सामाजिक कार्य पाहून पद देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous articleपूरग्रस्तांना मदतीचा हात – मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत
Next article“श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या नेतृत्वाखालील आंदोलन यशस्वी – कामगारांना हक्क मिळणार”
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.