आशाताई बच्छाव
पूरग्रस्तांना मदतीचा हात – मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत
गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ –येथील सिटी पॅथॉलॉजीचे तसेच आमचे डॉक्टर परिवारातील डॉ. प्रिया सकिनलावार आणि डॉ. पंकज सकिनलावार यांनी सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ₹२५,००० (पंचवीस हजार) रुपयांचा धनादेश माझ्या हाती सुपूर्द केला.
मुख्यमंत्री सहायता निधी हा आपत्तीच्या काळात गरजू नागरिकांना तातडीने मदत पोहचवण्यासाठी असणारा अत्यंत प्रभावी मार्ग आहे.
डॉ. प्रिया व डॉ. पंकज साकिनलावार तसेच सिटी पॅथॉलॉजी परिवाराचे मनःपूर्वक आभार, ज्यांच्या सहकार्यामुळे पूरग्रस्तांना थोडा दिलासा मिळेल.
अशा सामाजिक बांधिलकीने गडचिरोलीत सकारात्मक बदल आणि जनतेच्या हितासाठी योगदान सुनिश्चित होते.