आशाताई बच्छाव
नाशिक मनपा कामांच्या क्लब टेंडरींगला मनसेचा विरोध…
(आयुक्तांना दिले निवेदन; स्वतंत्र टेंडरची मागणी)
(प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)
नाशिक । महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचे क्लब टेंडर न काढता, स्वतंत्र कामांप्रमाणे स्वतंत्र टेंडर काढण्यात यावे अशी मागणी मनसेच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदनाव्दारे करण्यात आली.या निवेदनात म्हटले आहे की, सध्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध विकास कामे करण्यासाठी “क्लब टेंडर” या स्वरूपात एकत्रित टेंडर प्रक्रिया राबवली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु अशा पद्धतीमुळे स्थानिक स्तरावरील लघु व मध्यम ठेकेदारांना संधी मिळत नाही. तसेच, पारदर्शकता व स्पर्धा कमी होऊन फक्त मोठ्या ठेकेदार कंपन्यांनाच लाभ होतो. यामुळे स्थानिक लघु ठेकेदारांचे आर्थिक नुकसान होते. गुणवत्तापूर्ण कामे करण्यास स्थानिक पातळीवरील ठेकेदारांना वंचित केले जाते. एका ठेकेदाराकडे मोठ्या प्रमाणात कामे दिल्यामुळे वेळेत व
दर्जेदार कामे पूर्ण होण्याची शक्यता कमी राहते. नागरिकांच्या करातून होणारा खर्च स्पर्धात्मक न राहता जास्त होऊ शकतो. हे सर्व ठेकेदार सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहे. ज्यांना शासनाने लायसन्स प्रदान केले आहे. त्यांच्या लायसन्सचे करायचे काय…..? हे महानगरपालिकेने सांगावे. यामुळे पाच हजार ठेकेदार व मजूर संस्था बेरोजगार होणार आहे. सुशिक्षित तरुणांना बेरोजगारीचे धोरण राबवण्याचे पावले मनपा उचलत आहे का…? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर विकास होणार असला तरी, होणाऱ्या
विकासात इथला स्थानिक सुशिक्षित तरुण देशोधडीला लागणार आहे. त्यामुळे क्लब टेंडरिंग रदद करावे अन्यथा स्थानिक भूमी पुत्रांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर आण्णा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संदीप दादा भवर, सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे अध्यक्ष विनायक माळेकर, मनपा ठेकेदार संघटना संघटनेचे अध्यक्ष रणजीत शिंदे, निसर्ग राज सोनवणे मनोज घोडके, तुषार गांगुर्डे, सुशांत पाटील, सुरज खैरनार, साई गुंजाळ, आधी उपस्थित होते.