आशाताई बच्छाव
धुळे नंदुरबार संदीप पाटील ब्युरो चीफ- पुण्याचे उद्योजक व रावळगाव साखर कारखान्याचे चेअरमन बबनराव सोपानराव गायकवाड यांना पांझरा कान सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादासाहेब भुसे व तालुक्याचे लोकप्रिय सौ आमदार मंजुळाताई तुळशीरामजी गावित व भांडणे गावाचे लोकनियुक्त सरपंच अजयभाऊ सोनवणे यांच्या हस्ते पांझरा कान साखर कारखाने भांडणे येथे 9 ऑक्टोंबर या तारखेला हस्तांतर पत्र देण्यात येणार आहे व पुढच्या वर्षी ऊस गाढप हंगाम सुरू होणार आहे तरी शेतकरी बांधवांनी गायकवाड साहेब यांना ऊर्जा देण्यासाठी व प्रोत्साहन वाढवण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन साक्री तालुक्यातील जनतेला करण्यात आले.
साक्री तालुक्यातील महत्त्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला पांझरा कान साखर कारखाना अखेर सुरू होणार. साक्री तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आमदार माननीय मंजुळाताई गावित यांच्या प्रयत्नांना अखेर यश येत्या 9 ऑक्टोबर रोजी पांझरा कान साखर कारखान्याचे दिमागदार सोहळ्यात भूमिपूजन होऊन कारखाना लवकरच सुरू होणार….. गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून बंद असलेला पांजरा कान कारखाना सुरू होणार .
रावळगाव कारखाना चे चेअरमन श्री गायकवाड साहेब यांनी हा कारखाना घेतला असून अतिशय लवकरात लवकर या कारखाना मधून साखर बाहेर पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे.. त्याबद्दल साक्री तालुक्याच्या शेतकऱ्यांमध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण आहे.