आशाताई बच्छाव
आई वडिलांच्या सेवेतच चार धामाचे पुण्य ह भ प अभिषेक महाराज जाधव
सोनई /अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे: अरणगाव येथील शिंदेवाडी गावात शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त पहिल्या दिवसाचे कीर्तन ररुपी सेवा ह भ प अभिषेक जी महाराज जाधव यांची संपन्न झाली वैकुंठवासी परमपूज्य बाळकृष्ण महाराज बुंदे बाबा यांच्या आशीर्वादाने व हरिभक्त परायण हनुमंत महाराज लोटके यांच्या मार्गदर्शनाने चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पहिल्या दिवसाच्या कीर्तन अभिषेक जी महाराज जाधव यांनी नाम पर अभंगातून सदा नाम घोष करू हरी कथा / त्यांनी सदाचित्ता समाधान लोकांमध्ये भक्तिमय वातावरण पसरवले व यावेळी त्यांनी आई-वडिलांच्या सेवेत चार धामाचे पुण्य आहे असे सांगितले तसेच हिंदू धर्म रक्षण काळाची गरज धर्माचे पालन करणे पाखंड खंडण यावरही महाराजांनी सुंदर विवेचन केले कीर्तनासाठी उपस्थिती पुण्यातील शिक्रापूर येथील मीबा कंपनीचे एचआर हेड किरण गव्हाणे सर, उल्हास गव्हाणे सर,अनिल गव्हाणे सर,अक्षय दादा, पवार साहेब व आदी महाराज मंडळी उपस्थित होते तसेच संत पूजन माननीय राम भक्त गणेश भाऊ शिंदे यांचेहोते.