आशाताई बच्छाव
संभाजी गायकवाड कोतवाली पोलीस ठाण्याचे नवे प्रभारी. अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. त्यांच्या जागी संभाजी गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी काढले आहेत.
तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची नियुक्ती नियंत्रण कक्षात करण्यात आली. दरम्यान तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्याकडे प्रभारी चार्ज देण्यात आला होता. आज (ता. २५) रोजी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी मानवसंसाधन विभागात कार्यरत असलेले संभाजी गायकवाड यांची कोतवाली पोलीस ठाण्याच्या प्रभारी नियुक्ती करण्यात आली आहे, असे आदेश पोलीस अधीक्षक घार्गे यांनी काढले आहेत.