आशाताई बच्छाव
अहिल्यानगर जिल्ह्यात दोन दिवस ‘यलो अलर्ट’ अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे
भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यात २६ व २८ सप्टेंबर रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत या दोन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला
अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
धरण व नदी क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी
धरणाचे पाण्यात वा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये
धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये
नदी, ओढे-नाल्यांवरील पुल व बंधा-यांवरुन पाणी वाहत असल्यास पुल,बंधारे ओलांडू नये
आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी.