आशाताई बच्छाव
सौंदाळा ग्रामपंचायत गावातील सर्व मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे
नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतने विशेष ग्रामसभा घेऊन गावातील सर्व मुलींच्या शिक्षणाचा सर्व खर्च ग्रामपंचायतच्या वतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशा विविध समस्या संदर्भात विशेष ग्रामसभा घेतल्याची माहिती सरपंच शरद आरगडे यांनी दिली.
शेतकऱ्यांवर आलेल्या अस्मानी संकटाने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला असल्याने यापुढे सौंदाळा गावातील सर्व मुलींचा शैक्षणिक खर्च सौंदाळा ग्रामपंचायत करून शेतकरी कुटुंबातील मुलींचे पालकत्व घेत असल्याचे सरपंच आरगडे यांनी सांगितले.