Home सामाजिक सर्वसामान्यांच्या हक्कासाठी युवा मराठा महासंघाची दमदार व लढाऊ कर्तबगारी!!

सर्वसामान्यांच्या हक्कासाठी युवा मराठा महासंघाची दमदार व लढाऊ कर्तबगारी!!

150

आशाताई बच्छाव

1001995986.jpg

सर्वसामान्यांच्या हक्कासाठी युवा मराठा महासंघाची दमदार व लढाऊ कर्तबगारी!!

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी

मित्रांनो, सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय!
मी राजेंद्र पाटील राऊत संस्थापक युवा मराठा महासंघ आपणा सगळ्यांच्या साक्षीने सन २०२१ साली युवा मराठा महासंघ या सामाजिक संघटनेची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारसरणीला अनुसरून अठरा पगड जाती व बारा बलुतेदार असलेल्या सगळ्या जाती धर्मातील सर्वसामान्य, गोरगरीबांच्या हक्कासाठी व न्यायासाठी महासंघाचे ध्येय व धोरणे ठरवली.महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, अठरा पगड जातीच्या विकासासाठी! हे ब्रीदवाक्य महासंघाचे सामाजिक चळवळीतील कार्य वाढविण्यासाठी व नवचैतन्य निर्माण करून जागृतीची क्रांतिकारी चळवळ उभीं करण्यासाठी सोबत घेऊन आज सन २०२१ पासून महासंघाने विविध विषयांवर संघर्ष करुन आंदोलने केलीत व त्यात चांगल्या प्रकारे यश देखील प्राप्त झाले.महासंघाने सटाणा तालुक्यातील ताहराबाद वनविभागाच्या कार्यालयावर आंदोलन छेडून मांगीतुंगी भिलवाड गावातील आदिवासी बांधवांना न्याय मिळवून दिला हे महासंघाला मिळालेले सगळयात मोठे यश होतं, हे येथे अभिमानाने सांगावेसे वाटते.त्यानंतर रोझे ता.मालेगाव येथील अकार्यक्षम ग्रामसेवक बदली संदर्भात आंदोलन करून बदली केली.मालेगाव तालुक्यातील व-हाणे येथील प्रश्नावर सतत पाच वर्षे महासंघाचे आंदोलन सुरू आहे.तर येवला तालुक्यातील पुरणगाव ग्रामपंचायतीचा राजकारण करणारा कर्मचारी संतोष संपतं ठोंबरे यास सेवेतून बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी केलेले आंदोलन सुध्दा व्यशस्वी झाले आणि शेवटी चौकशी समिती स्थापन करून महासंघाने त्या तालुक्यात सुध्दा दमदार कामगिरी करून दाखवली.त्याशिवाय महासंघाने चांदवड तालुक्यातील कळमदरे गावात अवैध रितीने शासकीय गौण खनिजाची बेकायदेशीर सुरू असलेली चोरटी वाहतूक बंद पाडून शासनाच्या तिजोरीत लाखो रुपयांचा महसूल जमा करण्यास भाग पाडले.तसेच मालेगाव तालुक्यातील माल्हणगाव येथेही एका महिलेला विना दलाल व विना पैशाने अंगणवाडीच्या नोकरीत लावून देण्याचे पुण्यकर्म युवा मराठा महासंघाच्या माध्यमातून आम्ही करू शकलो. तसेच नगाव ता. मालेगाव येथील अन्यायग्रस्त बागुल कुटूंबाला न्याय मिळवून देण्याचे भाग्य युवा मराठा महासंघाला लाभले.एवढेच नव्हे तर युवा मराठा महासंघाच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील वानखेड गाव व परिसरात आमचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वप्नील बापू देशमुख यांनी स्वखर्चाने त्या भागात पुरात अडकलेल्या गोरगरीब बांधवांना किराणा मालाच्या किट्स वाटप करून सामाजिक चळवळीत महासंघाचे योगदान काय आहे हे दाखवून दिले.त्या पलिकडे जाऊन महासंघाचे कार्य हे संपूर्ण महाराष्ट्रात सुरूच आहे.सांगायचे तात्पर्य एवढेच की, हे सगळं आपल्या समोर मांडून आम्ही आमचा गुणगौरव सांगत आहोत अशातला भाग हा मुळीच नाही.पण युवा मराठा महासंघाच्या माध्यमातून कार्य करताना आम्ही कधी कुणाला आमचा शत्रू अथवा दुश्मन मानलेच नाही, फक्त जेथे जेथे अन्याय दिसला तेथे तेथे महासंघ उभा राहिला अगदी न्याय मिळेपर्यंत लढत राहिला.तरीही आमच्या बाबत गैरसमज पसरविणे,बदनाम्या करणे, प्रसंगी आम्ही सुरू केलेली ही लोकचळवळ कुठे तरी बंद व्हावी म्हणून आमच्यावर हल्ले करण्यासारखे गंभीर प्रकार सुध्दा घडले मात्र आम्ही न डगमगता या सगळ्या गोष्टींना आपला शुभ व गोड आशिर्वाद समजून अधिकच जोमाने कार्यरत झालोत.युवा मराठा महासंघाच्या वतीने मी फक्त एवढेच सांगू इच्छितो की, जेथे जेथे न्यायाची आवश्यकता आहे.गोरगरीबांचा आवाज दडपला जाऊन ते अन्याय अत्याचाराचे शिकार ठरत आहेत.तेथे सदैव युवा मराठा महासंघ आपल्या सोबत आहे,ते सुद्धा अगदी न्याय मिळेपर्यंत! एव्हढेच यानिमित्ताने…

राजेंद्र पाटील राऊत
संस्थापक अध्यक्ष युवा मराठा महासंघ महाराष्ट्र
संस्थापक अध्यक्ष आश्रय आशा फाऊंडेशन व-हाणे, संस्थापक अध्यक्ष लोकहित माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटना महाराष्ट्र, मुख्य संपादक युवा मराठा न्यूज पेपर्स अँन्ड वेब न्यूज चॅनल महाराष्ट्र