Home उतर महाराष्ट्र पूरपरिस्थितीत प्रशासनाकडून १३१ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!

पूरपरिस्थितीत प्रशासनाकडून १३१ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!

38

आशाताई बच्छाव

1001989518.jpg

अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे -पूरपरिस्थितीत प्रशासनाकडून १३१ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
जिल्ह्यात २२ ते २३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाथर्डी, शेवगांव, जामखेड व कर्जत या तालुक्यातील ओढे-नाले व नदीकाठावरील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली. या पुराच्या पाण्यात अडकलेल्या १३१ कुटुंबांची सुरक्षितस्थळी प्रशासनाने स्थलांतर केले आहे. प्रशासन, स्थानिक नागरिक व शोध-बचाव पथकाने सुटका
पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या कर्जत व शेवगाव तालुक्यातील निंबोडी, तरडगाव, मलठण, सितपूर, आखेगाव व भगूर या गावांतील १३१ कुटुंबांतील सुमारे ४६५ नागरिक, १४९ जनावरे जनावरांना गावातील शाळा व नातेवाईकांकडे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत एनडीआरएफचे पुणे पथक कर्जत तालुक्यात तर एसडीआरएफचे धुळे पथक पाथर्डी तालुक्यात तैनात असून, जिल्हा प्रशासन सतत लक्ष ठेवून आहे,

Previous articleओला दुष्काळ जाहीर करा हेक्टरी ५० हजार मदत करा वसमत सरपंच संघटनेचे उपविभागीय अधिकारी माने यांना निवेदन.
Next articleत्र्यंबकेश्वर येथे पत्रकांवरील हल्ल्याचा मोखाड्यात निषेध
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.