आशाताई बच्छाव
शेतकऱ्याचा भावनिक प्रश्न
दहा वर्षांपूर्वी सोयाबीनला जो भाव होता… तोच भाव आजही आहे!
पण या दहा वर्षांत महागाईने आभाळ गाठले, डिझेल-पेट्रोलचे दर आकाशाला भिडले, खतं-दवाखानं-पिकाची मशागत दुप्पट-तिप्पट महागली… मग शेतकऱ्याच्या सोयाबीनला जुना भावच का?
प्रगती नेत्यांच्या भाषणात झाली, शेतकऱ्याच्या शेतात नाही.
सभांमधून दिले जाणारे आश्वासने, प्रगतीच्या गप्पा, शेतकऱ्याच्या जीवनात मात्र फक्त फसवणूक घेऊन आल्या.
आज शेतकरी पेरतो, पिकवतो, राबतो, घाम गाळतो, पण बाजारात गेला की त्याचा घाम कौडीमोलाचा होतो.
दहा वर्षांत प्रत्येक क्षेत्र बदलले, प्रगती केली… पण शेतकऱ्याच्या उत्पादनाला मिळणारा भाव मात्र दहा वर्षांपूर्वी जिथे होता तिथेच आहे.
मग शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आयुष्य, हे कोण पाहणार?
शेतकऱ्याला ‘जगवू’ असं सांगून फक्त मतं मागितली, पण खऱ्या अर्थाने शेतकरी जगला आहे का?
आज प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच आक्रोश आहे –
“आमच्या शेतमालाला खरी किंमत द्या… अन्यथा आमच्या पिढ्या शेती सोडतील. भाषणातून नाही तर शेतातून प्रगती दिसली पाहिजे.”
👉 शेतकरी हा देशाचा कणा आहे. तो वाकलाय, पण तुटलेला नाही. मात्र न्याय्य दर न मिळाल्यास हा कणा मोडायला वेळ लागणार नाही!
— स्वप्निल बाप्पू देशमुख ( पत्रकार)
मो. 9552381088