आशाताई बच्छाव
उद्या येवला पंचायत समिती समोर
युवा मराठा महासंघाचे उपोषण आंदोलन
येवला प्रतिनिधी:- येवला पंचायत समिती समोर युवा मराठा महासंघाचे २५ सप्टेंबर पासून आमरण उपोषण आंदोलन छेडले जाणार असल्याची माहिती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी दिली.
संबंधितांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येवला तालुक्यातील पुरणगाव ग्रामपंचायतीचा कर्मचारी संतोष संपतं ठोंबरे हा मनमानी पद्धतीने कामकाज करून सरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांना वेठीस धरणे,वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून कर्मचारी संघटनेच्या नावाचा गैरवापर करून हिटलरशाही पध्दतीने शासकीय कामकाजात सातत्याने अडथळे आणून गावातील नागरिकांत गैरसमज पसरविणे अशा प्रकारे शासकीय कामात खोळंबा आणून मनमानी करीत असल्याने त्यास तडकाफडकी निलंबित करुन चौकशी समिती स्थापन करण्यात येऊन त्याच्या संपूर्ण कार्यकाळाची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी हे आमरण उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेवटी महासंघाने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.