आशाताई बच्छाव
मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा २७ रोजी नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळा
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी
मनु मानसी महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्था नाशिक यांच्या वतीने नवरात्री निमित्त नवदुर्गा पुरस्कार देण्यात येणार आहे.२७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या नवदुर्गा पुरस्काराचे प्रमुख पाहुणे डॉ शेफाली ताई भुजबळ, मा.श्री.अंबादास जगन्नाथ खैरे आणि सौ.शिलावंती माई कैलास त्रिभुवने उपस्थित असणार आहे. विशेष उपस्थिती मा मंजूताई जाखाडी, मा धनश्री गायधनी आणि मा.सौ.सोनाली थोरात यांचे विशेष सहकार्य कार्यक्रमास लाभले आहे. या मान्यवरांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
नवदुर्गा म्हणजे हिंदू धर्म मधील नऊ रूपे. जी नवरात्रीच्या नऊ दिवसांत पुजली जातात. जे वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते. शैलीपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धीधात्री या नऊ रूपाना नवदुर्गा म्हणतात. सृष्टी मध्ये नऊ मिती आहे आणि प्रत्येक मितीवर एका नवदुर्गा देवीचे आधिपत्य असते नवरात्री मध्ये देवीची पूजा केल्याने देवीची कृपा कायम असते आणि भक्तांच्या शक्ती मध्ये वाढ होते. म्हणून आपल्या सोबत असणाऱ्या अश्या नवदुर्गांचा सन्मान केला जातो. कारण त्यांच्या जीवनात अनेक अडीअडचणी, सुख दुःख असतात त्यावर आमच्या मैत्रीणी मात करून जीवन जगत असतात. या पुरस्काराने प्रत्येक महिलेला आपल्यामध्ये दुर्गेचे रुप जाणवते असे मत संस्थेच्या संस्थापिका सौ मेघा शिंपी यांनी व्यक्त केले
मनु मानसी महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने नवरात्री निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नवदुर्गा पुरस्कार दीपलक्ष्मी मंगल कार्यालय येथे आयोजित केला आहे. ज्या महिला विविध क्षेत्रात कार्य करतात किंवा घरचे काम पण तारेवरची कसरत असते अशा माता साठी ५१ नवदुर्गा ना पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये ट्रॉफी,सर्टिफिकेट, ओटी भरून पूजन करणे आणि नाश्ता देण्यात येईल अशी माहिती संस्थेच्या संस्थापिका सौ. मेघा राजेश शिंपी यांनी दिली. या पुरस्काराचे आयोजन संस्थेच्या संस्थापिका सौ. मेघा शिंपी, ॲड.विनया नागरे आणि सौ. मिरा आवारे यांच्या मार्गदर्शनाने पुरस्काराचे नियोजन करण्यात येत आहे. मनु मानसी संस्थेच्या टीमचे सहकार्य मिळत आहे.
विशेष नऊ नवदुर्गा पुरस्कार महिला
सौ. स्वाती सावंत, सौ. मनोरमा पाटील, सौ. दिपाली नागपुरे, सौ. निशिगंधा कापडणीस, सौ. यमुना लिंगायत, अश्विनी पुरी, सौ.रंजना चंद्रमोरे, सौ. हर्षदा सोनवणे आणि सौ. कविता गायके या नऊ भगिनींना विशेष नवदुर्गा पुरस्कार जाहीर झाला असून या विविध क्षेत्रात कार्य करतात.