आशाताई बच्छाव
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्ताचे सरसकट पंचनामे करून,, तात्काळ मदत द्या,- भाजपा उपाध्यक्ष -विशाल धनगर
सोनई प्रतिनिधी कारभारी गव्हाणे:नेवासा तालुक्यामध्ये आठ दिवसापासून अतिवृष्टी व सततचा पाऊस झाल्याने तालुक्यातील खरीप पिक,कापूस ,सोयाबीन ,तूर ,मूग ,उडीद ,मका,बाजरी सह फळबागाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शासनाने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे मागणी भाजपाचे नेवासा तालुका उपाध्यक्ष विशाल धनगर यांनी नायब तहसीलदार यांच्याकडे निवेदन द्वारे केली आहे.या हंगामामध्ये पडलेल पावसाचा खंड व त्यानंतर असलेली अतिवृष्टी आणि रोगाच्या साथी किडीचा प्रादुर्भाव यामुळे हजारो एकर क्षेत्र आधीच बाधित झाले असताना परतीच्या पावसाने उरल्या सुरल्या पिकाचेही नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे.
पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक जमिनीतील पीक व जमिनी खरडून गेलेले आहेत,, बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्याने पाण्याचा निचरा न झाल्याने लोकांच्या घरात पाणी घुसले किंबहुना काही ठिकाणी घरावर झाडे पडून घरे उध्वस्त झाले आहे, काही घरे ,गुराचे गोठे , कोसळले असून नुकसानग्रस्ताच्या घरातील जीवनावश्यक वस्तूसह सर्व सामान भिजल्याने (अन्नधान्य कपडे व इतर) समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे.. काही बाजारपेठामध्ये पुराचे पाणी गेल्याने व्यापाऱ्यांचेही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
तरी तालुक्यातील सर्वच मंडलामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून आपण मंडलाध्यक्षांना व तलाठी अधिकारी यांना सूचना करून प्रशासनाने सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत देण्याची मागणी नेवासा तालुक्याचे भाजप पक्षाचे उपाध्यक्ष विशाल धनगर यांनी नेवासा येथील नायब तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.