Home उतर महाराष्ट्र अहिल्यानगर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२५ पोलीस मुख्यालय येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरनात संपन्न.

अहिल्यानगर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२५ पोलीस मुख्यालय येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरनात संपन्न.

111

आशाताई बच्छाव

1001984066.jpg

 

अहिल्यानगर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२५ पोलीस मुख्यालय

येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरनात संपन्न             श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी 

पोलीस मुख्यालय कवायत मैदान अहिल्यानगर येथे जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा -२०२५ या दिनांक. १८/०९/२०२५ रोजी ते दिनांक. २२/०९/२०२५ या कालावधी मध्ये आयोजीत केल्या होत्या त्या मध्ये पोलीस मुख्यालय नगर शहर विभाग, श्रीरामपुर, कर्जत, शेवगाव शिडी व संगमनेर अशा विभागांनी सहभाग घेतला होता.

सदर स्पर्धेत कबड्डी, खोखो, हॅण्डबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कुस्ती, बॉक्सींग, ज्यु डो तसेच मैदानी स्पर्धा अशा विविध प्रकारच्या खेळांचे उत्तम आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धे मध्ये खेळाडुंनी अत्यंत हिरीरीने भाग घेतला.

आज दिनांक. २२/०९/२०२५ रोजी मा.श्री. डॉ. पंकज आशिया (भा.पो.से) जिल्हाधिकारी अहिल्यानगर व मा.श्री. सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधिक्षक साो, अहिल्यानगर यांचे उपस्थितीत सदर क्रीडा स्पर्धेचे समारोपन पार पडले क्रीडा स्पर्धेत पोलीस मुख्यालय विभागाने सर्व साधारण विजेते पद पटकावले.

मा.श्री. डॉ. पंकज आशिया जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी खेळाडुंना मार्गदर्शन

केले. मा.श्री. सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधिक्षक साो अहिल्यानगर यांनी आगामी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रिडास्पर्धे मध्ये अहिल्यानगर जिल्हयातील पोलीस खेळाडु विशेष पदके पटकावुन आपल्या जिल्हा पोलीस दलाचे नावलौकीक करतील असे प्रोत्साहन व मार्गदर्शन केले. तसेच समारोप समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व पोलीस अधिकारी, खेळाडु

पोलीस अंमलदार व अहिल्यानगर शहरातील प्रतिष्ठीत मान्यवर, पत्रकार बंधु, प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनीधी, पंच क्रीडा मार्गदर्शक यांचे देखिल अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे आभार मानण्यात आले,

Previous articleसुवर्णपदाची मानकरी कु. मुस्कान अत्तार
Next articleप.पु. श्री सद्गुरु देवेंद्रनाथ महाराज मंदिर साईनाथ नगर नेवासा मंदिराची कार्यकारणी जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.