आशाताई बच्छाव
अहिल्यानगर, प्रतिनिधी कारभारी गव्हाणे –जिल्ह्यावर जलसंकट; अनेक गावे गेली पाण्याखाली, सर्व नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण व वाडेगव्हाण परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांची शेतातील उभी पिके भुईसपाट झाली आहेत. ओढ्यांना पूर आला आहे तसेच शेती पिकांचे, शेतीच्या बांधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतातील माती वाहून गेली आहे.
श्रीगोंदा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने नदीकाठावरील शेतजमिनी जलमय झाल्या असून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे.
नेवासा तालुक्यातील कौठा येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी रिमझीम तर काही ठिकाणी मोठा पाऊस सुरु आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून मोठ्या स्वरूपाच्या पावसाला सुरूवात झाल्याने नदी, नाले, ओढे तुडूंब भरून वाहत आहेत. या पावसामुळे सोयाबीन, मका, बाजरी, कांदा तसेच कडधान्य पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.