आशाताई बच्छाव
निधन वार्ता
गं भा काशीबाई फकिरराव धनाईत
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी
एकरुखे (धोडांबे) तालुका चांदवड येथील प्रगतशील शेतकरी अशोकराव फकिरराव धनाईत यांच्या मातोश्री गं. भा. काशीबाई फकीरराव धनाजी यांचे बुधवार दहा सप्टेंबर रोजी वयाच्या 95 व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी संसाराचा गाडा ओढत आपल्या चारही मुलांना अध्यात्माचे व सुसंस्काराचे धडे दिले. पूर्वीच्या काळी एकत्रित कुटुंब पद्धतीतही त्यांनी सर्व परिवाराला सांभाळून घेत प्रपंचाचा गाडा समर्थपणे चालविला होता. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, एक पुतण्या, एक पुतणी, सुना, नातू पणतू असा मोठा परिवार आहे.त्यांच्या अंत्य समयी एकरुखे धोडांबे सह पंचक्रोशीतील आप्तेष्ट, सगेसोयरे, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचा दशक्रिया विधी चा कार्यक्रम धोडांबे तालुका चांदवड येथे शुक्रवार १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता होणार असून याप्रसंगी ह भ प भिका महाराज रकिबे धोडांबेकर यांचा प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे.