आशाताई बच्छाव
नाशिवंत देह जाणार सकळ ! आयुष्य खातो काळ सावधान !!
प्रत्येक व्यक्तीला भगवंताची प्राप्त प्राप्त व्हावी अशी सातत्याने वाटत असते परंतु भगवंताची प्राप्ती करण्यासाठी नामधारकाने साधना, भक्ती, नामस्मरण या गोष्टींना अधिक महत्त्व दिले पाहिजे. साधू संतांनी भगवंताची प्राप्ती होण्यासाठी एकच साधन सांगितलं आहे ते म्हणजे देव आपलासा करून घ्यावा. कारण तुकाराम महाराज देखील अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादित करतात की, आपुला तो एक देव करुनी घ्यावा । तेणे विना जिवा सुख नोव्हे, अखंड काळ मनुष्य जीवनात सुख वास्तव्य करत असत कारण मनुष्य देह धारण केलेल्या प्रत्येक जी वाला देवाबद्दल आसक्ती असणं गरजेचं आहे. कारण मिळालेला देह कशासाठी तर भगवंताने त्याचे गुण, कौतुक आपल्या मुखातून व्हावं या अनुषंगाने या मनुष्य दे हाची निर्मिती केली. देवे दिला देह भजना गोमटा या युक्ती प्रमाणे मिळालेला देह नाशवंत आहे हा काही काळापुरताच मर्यादित आहे, विनाशी स्वरूपाच्या देहाबद्दल मनुष्याला एवढे ममत्व का, प्रत्येक जीवाला माहित आहे कि हा देह नश्वर आहे आणि या देहाला अंतिम समयी याचं ठिकाणी सोडून जायचं असेल तर या देहाला मोह, माया, ऐश्वर्य या बद्दल एवढी आसक्ती का ? नाशिवंत देह जाणार सकळ ! आयुष्य खातो काळ सावधान !! सावधान या ठिकाणी मनुष्याला सुचित केलेली आहे की, हा नर देह नश्वर आहे. म्हणून परमेश्वराने दिलेल्या सुंदर नरदेहाचा उपयोग भगवंताच्या प्राप्तीसाठी केला तर खऱ्या अर्थाने आपल्या जन्माचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनात काही गोष्टी मनुष्याला काही काळ सुखी करत असतात तरी पण संपूर्ण आयुष्यभर मनुष्य त्याच गोष्टीसाठी धावपळ करत असतो, या मृत्युलोकामध्ये कुणीही कुणाचं नसतं प्रत्येक जण हा स्वतःच्या हितासाठी जगत असतो. अंतिम समयी मनुष्याला एकट्याला या देहाला सोडून जावं लागत त्यावेळी कुठल्याही मोह माया उत्पादीत करणाऱ्या गोष्टी मनुष्याला सोबत घेऊन जाता येत नाहीं हा नाशवंत देह असून त्यावर एवढं प्रेम करण्या पेक्षा तेच प्रेम भगवंतावर केलं तर अखंडकाळ मनुष्य जीवनात सुख वास्तव्य करत असतं, म्हणून भरकटलेल्या मनाला देवाच्या नामस्मरणाची गोडी लावणे अत्यंत गरजेचे आहे.
सौ रेखाताई संदीप काकड
कोअर कमिटी सदस्य कर्तव्य दक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन