आशाताई बच्छाव
संभाजी ब्रिगेड स्थानिक स्वराज्य संस्था ताकदीने लढणार
युतीची सर्व दारे खुली -जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील
विशेष प्रतिनिधी :— प्रकाश खंडागले
हॉटेस केव्ही प्राईड मेहकर येथे संभाजी ब्रिगेड कार्यकारिणी विस्तार व पत्रकार बांधवांचा भव्य सन्मान सोहळा प्रचंड उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष रविंद्र चेके तर प्रमुख उपस्थितीत संभाजी ब्रिगेड राज्य संघटक योगेश पाटील,संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील, मराठा सेवा संघाचे परमानंद गारोळे, राजेंद्र पवार, दिनकर शिंदे, महादेव ससाने आदी होते.यावेळी मेहकर व लोणार तालुक्यातील नियुक्त्या देन्यात आल्या.मेहकर तालुकाध्यक्ष पदी धनंजय बुरकुल तर लोणार तालुकाध्यक्ष पदी विजय पिसे यांची नियुक्ती करन्यात आली.त्याचबरोबर तालुका कार्यकारिणी नियुक्त्या करन्यात आल्या.यावेळी दोनही तालुक्यातील शहरांसहीत ग्रामीण भागातील मंडळीचा प्रचंड उत्साह बघायला मिळाला.लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार बांधव कार्य करतात म्हणुन सर्वसामान्यांच्या चळवळींचा आवाज जिवंत आहे असे मत व्यक्त करत उपस्थित सर्व प्रत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देवुन सन्मान करन्यात आला.तदनंतर पत्रकार परिषद घेत पत्रकारांच्या प्रश्नांवर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्यांनी उत्तरे दिली.यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत भुमिका स्पष्ट करताना जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील यांनी संभाजी ब्रिगेड पुर्ण ताकदीने लढनार व सर्वसामान्य शेतकरी कष्टकर्यांची होतकरु पोरं संविधानीक पदावर पाठवनार असे मत व्यक्त केले. तसेच जो कुठला पक्ष आमच्याशी युतीला तयार असेल त्यांच्याशी उचित वाटाघाटी करु अन्यथा छोटे छोटे घटकपक्ष सोबत घेवुन एक नव समिकरन तयार करु असेही मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी पदनियुक्त्यांमद्ये कैलास पाचपोर जिल्हा कार्याध्यक्ष, ॲड.राहुल तुपे जिल्हा विधी सल्लागार, सुनिल वाघमारे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, विकास तेजनकर जिल्हा संघटक,विजय पिसे लोणार तालुकाध्यक्ष, धनंजय बुरकुल मेहकर तालुकाध्यक्ष, कैलास पवार तालुका सचिव, सुनिल बोबडे ता.सहसचिव, नितीन वैराळ तालुका कार्याध्यक्ष,रमेश बचाटे तालुका उपाध्यक्ष, रमेश माल तालुका उपाध्यक्ष, गजानन पवार तालुका उपाध्यक्ष, भागवत दिघडे तालुका संघटक, दत्ता डव्हळे ता.प्रसिद्धी प्रमुख, गजानन पवार कार्यकारिणी सदस्य पदी नियुक्त्या करन्यात आल्या.यावेळी तालुका व जिल्ह्यातील शेकडो नवयुवक संभाजी ब्रिगेड मद्ये सामिल झाले.पत्रकार बांधवांच्या वतीने समाधान व्यक्त करन्यात आले.