आशाताई बच्छाव
विहिरीत बिबट्या पडल्याने भितीचे वातावरण
शेवडीपाड्यात वनविभागाकडून रेस्क्युः बिबट्याला सुखरूप काढले बाहेर; गावकऱ्यांचा सुटकेचा निश्वास
साक्री संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ- पिंपळनेर वनविभागाच्या हद्दीतील शेवडीपाडा गावात एका दीड वर्षाच्या बिबट्याची विहिरीत पडल्याने चांगलीच धांदल उडाली होती. मात्र, वनविभागाच्या पथकाने तातडीने केलेल्या बचावकार्यामुळे बिबट्याचा जीव वाचला आणि गावकऱ्यांनीही सुटकेचा श्वास घेतला.
सकाळी विहिरीजवळून जात असताना दिगंबर गांगुर्डे यांना बिबट्याच्या मोठ्या किंकाळ्या ऐकू
आल्या. त्यांनी सरपंचांना माहिती दिल्यावर सर्वांनी पाहणी केली आणि बिबट्या विहिरीत पडल्याचे समजले. त्यानंतर तातडीने वनविभागाला कळवण्यात आले. बिबट्याला पाहण्यासाठी घटनास्थळी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
माहिती मिळताच, आरएफओ ओंकार ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. यात वनपाल आर. व्ही. चौरे, वनपाल दयाराम सोनवणे, वनपाल संदीप मंडलिक, मेजर अनिल घरटे,
अमोल पवार, देवा देसाई, वरुण माळी, गुलाब बारीस, वनसेवक बाजीराव पवार, उज्जैन चौधरी आणि वन्यजीव संरक्षण संस्थेचे सलीम पटेल व त्यांचे सहकारी यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांनी जेसीबीच्या मदतीने पिंजरा विहिरीत उतरवला. काही मिनिटांतच बिबट्या पिंजऱ्यात शिरला आणि त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या यशस्वी बचावकार्यामुळे बिबट्याचे प्राण वाचले असून, वनविभागाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.