आशाताई बच्छाव
लोकहित माहिती अधिकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी मुख्याध्यापक गोरखनाथ कुणगर
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी
नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, न्यु दारणा हायस्कूल नासिक चे मुख्याध्यापक गोरखनाथ वामनराव कुणगर धोटाणे तालुका नांदगाव यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत लोकहित माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक राजेंद्र राऊत पाटील यांनी दिली आहे.
क्रांतीदिनी लोकहित माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटना राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून राज्य कार्यकारिणीत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातल्या दोन पुरुष व दोन महिलांना स्थान देण्यात येणार असून, आगामी काळात जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय व शहरी कार्यकारिणी गठित केल्या जाणार आहेत.तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेडोपाडी संघटनेच्या शाखा स्थापन करण्यात येऊन, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधात क्रांतीकारी स्वरुपात लढा उभारला जाणार आहे.शिवाय पत्रकार व पोलीस बांधवांच्या हक्क व न्यायासाठी संघटनेचे नियोजन ठरविण्यात आले आहे. संघटनेत सहभागी होणाऱ्या सभासदांना ओळखपत्र सोबतच पंधरा लाख रुपयांचा अपघाती विमा एक वर्षासाठी दिला जाणार असल्याचे लोकगीत माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र राऊत पाटील यांनी पत्रकातून माहिती दिली आहे.
मुख्याध्यापक गोरखनाथ कुणगर यांच्या निवडीबद्दल लोकहित माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटनेचे संस्थापक राजेंद्र पाटील राऊत, राज्य कार्यकारिणी मुख्य सचिव आशाताई बच्छाव, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामभाऊ आवारे सर निफाड, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिलीप पाटील सांगली, मुख्याध्यापक गोरखनाथ कुणगर प्रदेश उपाध्यक्ष नाशिक, भारत पवार प्रदेश उपाध्यक्ष ओझर, नरेंद्र पाटील प्रदेश उपाध्यक्ष जळगाव , प्रथमेश गायकवाड प्रदेश राज्य सचिव ठाणे, उमेश कुलकर्णी प्रदेश राज्य सचिव ओझर, फैयाज मोमीन प्रदेश राज्य कोषाध्यक्ष भिवंडी, मुजद्दीन मोमीन अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष रायगड ,शत्रुघ्न निकम भटके विमुक्त जाती जमाती अध्यक्ष सोलापूर, सूर्यकांत भोर महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख पुणे,आदींसह सर्व कार्यकारिणीच्या वतीने अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या आहे.