आशाताई बच्छाव
सुनील मदनुरे पाटील यांची शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी निवड
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
पत्रकार तथा संपादक सुनील मदनुरे पाटील यांची शिवसेना (शिंदे गट) बांधकाम कामगार सेनेच्या नांदेड जिल्ह्याच्या उपजिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र राज्य प्रमुख प्रीतम सेट धारिया, श्री. विनोद भिमराव नेमाडे (मराठवाडा प्रमुख) तसेच जिल्हाप्रमुख रवी अर्जुनराव पोटफोडे यांच्या शिफारसीनुसार ही निवड जाहीर करण्यात आली.
या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख चव्हाण साहेब, देगलूर तालुकाप्रमुख अशोकराव पांडलवार, जिल्हाप्रमुख रवी अर्जुनराव पोटफोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना सुनील मदनुरे पाटील म्हणाले, “आपल्याला एकनाथराव शिंदे यांच्यासारखा कार्यकर्त्यांचा जपणारा नेता लाभलेला आहे. आज मला मिळालेलं हे पद मी माझं भाग्य समजतो. शिंदे साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो की त्यांनी मला ही मोठी संधी दिली. मी जिल्ह्यातील गोरगरीब कष्टकरी बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या सर्व सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन.”
यावेळी त्यांनी पुढे सांगितले की, “आमदार हेमंत भाऊ पाटील, आमदार बालाजीराव कल्याणकर व आमदार आनंदराव बोंढारकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नांदेड जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष ठरेल, अशी कामगिरी आपण सर्वजण करू.”
या निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सुनील मदनुरे पाटील यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.